करोनाचा जेएन.१ व्हेरियंटचा राज्यात शिरकाव; कुठे आढळला पहिला रुग्ण?
Corona JN-1: कोरोनाच्या जेएन-१ या नव्या उपप्रकाराची रुग्णसंख्या वाढत असून, महाराष्ट्र आणि केरळात प्रत्येकी एक, तर गोव्यात १९ रुग्णांची नोंद दक्षता बाळगा… घाबरू नका, कोरोना रुग्णसंख्या वाढीवर आरोग्य मंत्र्यांचे आवाहन.
नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या जेएन-१ या नव्या उपप्रकाराची रुग्णसंख्या वाढत असून, महाराष्ट्र आणि केरळात प्रत्येकी एक, तर गोव्यात १९ रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेतला. आपल्याला खबरदारी घेण्याची गरज असून घाबरण्याची नाही, असे मांडविया यांनी स्पष्ट केले.
आरोग्य मंत्रालयाच्या सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे ६१४ नवे रुग्ण आढळले. २१ मे नंतरची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. सध्या देशात कोरोनाचे २,३११ सक्रिय रुग्ण आहेत. २४ तासांत केरळातील तीन रुग्णांच्या मृत्यूमुळे बळींचा आकडा ५ लाख ३३ हजार ३२१ झाला आहे.
नागपूर येथे नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बैठक घेऊन सूचना जारी केल्या. जेएन-१ हा ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार असून याची सौम्य लक्षणे रुग्णात आढळून येतात. या व्हेरियंटची भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता घेण्याची गरज
उपप्रकाराला ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ या कक्षेत ठेवले आहे. हा सबव्हेरियंट फार धोकादायक नसल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे. कोरोना महामारीत आरोग्य संघटनेने या विषाणूच्या कमी धोकादायक स्वरूपाचे ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ आणि ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ असे वर्गीकरण करणे सुरू केले होते. डब्ल्यूएचओनुसार जेएन-१ हा उपप्रकार बीए-२.८५ व्हेरियंटशी संबंधित आहे.
भारतीय सार्स कोव्ह-२ जीनोमिक्स कंसोर्टियम अर्थात आयएनएसएसीओजीच्या आकडेवारीनुसार, देशात जेएन-१ सब-व्हेरियंटच्या २१ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी महाराष्ट्र आणि केरळात प्रत्येक एक, तर गोव्यात १९ रुग्ण आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने आणि त्यातही अधिक संसर्गजन्य असलेल्या जेएन-१ या सब-व्हेरियंटचा देशात शिरकाव झाल्याने केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बुधवारी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि अतिरिक्त मुख्य सचिवांसोबत ऑनलाइन माध्यमातून बैठक घेत राज्यनिहाय आरोग्य यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेतला. मांडविया यांनी राज्यांना दक्षता बाळगण्याची आणि देखरेख वाढवण्याचे आवाहन केले. आपल्याला घाबरण्याची गरज नाही कोविड जेएन-१ च्या नवीन उपप्रकाराबाबत केंद्र सरकार सतर्क झाले असून केंद्राने राज्यांना पत्र लिहून संशयितांवर लक्ष ठेवावे, त्यांची चौकशी करावी आणि जीनोम सिक्वेन्सिंगसाठी निदान केलेले नमुने पाठवावेत, असे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे शहरातील तज्ज्ञांनी मुंबईकरांना सतर्क राहण्याचा आणि खबरदारी घेण्याची गरज आहे. केंद्राकडून राज्यांना सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे ते म्हणाले. केंद्र आणि राज्य पातळीवर रुग्णालयांमध्ये दर तीन महिन्यांनी मॉकड्रील करण्यात यावे. याद्वारे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, सिलिंडर, व्हेंटिलेटर्सची कार्यक्षमता आणि औषधांची उपलब्धता तपासावी, अशा सूचना आरोग्य मंत्र्यांनी दिल्या. मांडविया यांनी अधिकाऱ्यांना कोरोना चाचणीच्या नमुन्यांचे जिनोम सिक्वेसिंग करण्याचेही निर्देश दिले आहेत. चीन, ब्राझील, जर्मनीसह काही देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. देशातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक राज्यांनी आपापल्या पातळीवर दिशानिर्देश जारी केले आहेत.
विषाणूबाबत काळजी घेण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे. गर्दीच्या ठिकाणी घाबरण्याऐवजी मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.
सिंधुदुर्गमध्ये सापडला जेएन-१चा पहिला रुग्ण
पुणे: भारतात जेएन-१ या विषाणूचे रुग्ण केरळमध्ये सापडले आहेत. रुग्णामध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे या विषाणूची भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे. राज्यामध्ये नियमितपणे आढावा घेण्यात येत असून चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. यामध्ये राज्यातील सिंधुदुर्गमध्ये जेएन-१चा पहिला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण सिंधुदुर्गमधील ४१ वर्षांचा पुरुष असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृतीदेखील ठीक आहे. मात्र याबाबत गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे व इतर कोविडचे नियम पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
Web Title: Entry of JN.1 variant of Corona into the state; Where was the first patient found
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App