Home राष्ट्रीय करोनाच्या नवीन स्ट्रेन JN.1 ने दिला अलर्ट; भारतात २४ तासात ५ मृत्यू

करोनाच्या नवीन स्ट्रेन JN.1 ने दिला अलर्ट; भारतात २४ तासात ५ मृत्यू

Covid 19 New variant JN1:  केरळमध्ये चार रुग्णांचा गेल्या २४ तासांत मृत्यू कर्नाटक राज्यात अलर्ट देण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क.

New strain of Corona JN.1 alerted 5 deaths in 24 hours

नवी दिल्ली | Corona Virus: कोव्हिड-१९ च्या नव्या व्हेरिएंट जगाची चिंता पुन्हा वाढवली आहे. कोव्हिड-१९चा नवा व्हेरिएंट जेएन-१ हा अधिक वेगाने वाढू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतात केरळमध्ये जेएन-१ चे एक प्रकरण समोर आले असून ७८ वर्षीय एका महिलेला याची लागण झाली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित महिलेला आधीपासून करोनाची लक्षणे जाणवत होती आणि आता ती पूर्णपणे बरी आहे. दरम्यान भारतात गेल्या २४ तासात करोनामुळे ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केरळमध्ये नवा व्हेरिएंट सापडल्यामुळे शेजारी असलेल्या कर्नाटक राज्यात अलर्ट देण्यात आला आहे. येथील राज्य सरकारने ६० वर्षावरील सर्व व्यक्तींसाठी मास्क अनिवार्य केला आहे. मात्र सार्वजनिक ठिकाण मास्कसाठी कोणतेही बंध नाही. केरळमध्ये काल म्हणजे रविवारी करोनाचे नवे १११ रुग्ण आढळले होते. देशात २४ तासात ज्या ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यापैकी ४ जण केरळमधील होते.

फक्त भारतातच नाही तर जगभरात अनेक देशात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. सिंगापूरमध्ये गेल्या आठवड्यात ५६ हजार नवे रुग्ण सापडले होते. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार व्हायरस विकसीत होत आहे आणि सातत्याने बदलत आहे. WHOने जेएन १ ला BA.2.86 च्या सब व्हेरिएंट म्हटले आहे.

Web Title: New strain of Corona JN.1 alerted 5 deaths in 24 hours

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here