अहमदनगर: बोलेरो व डंपर यांचा समोरासमोर भीषण अपघात, बोलेरोचालक जागीच ठार
Ahmednagar Accident News: उड्डाणपुलावर बोलेरो व डंपर यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातांमध्ये बोलेरोचालक जागीच ठार.
अहमदनगर : नगर सोलापुर महामार्गावरील शिरढोण शिवारातील असलेल्या उड्डाणपुलावर बोलेरो व डंपर यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातांमध्ये बोलेरोचालक जागीच ठार झाला. मंगेश दिलीप नागवडे (वय ४० रा. गुणवडी ता.नगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
नगर जिल्ह्यातील अपघातांची मालिका संपण्याचे नाव घेईना. नगर तालुक्यातील अपघाताच्या काही घटना ताजा असतानाच आज हा भीषण अपघात झाला. शनिवारी दि.१६ रोजी सकाळी १० च्या सुमारास शिरढोण उड्डाणपुलावर बोलेरो जीप व डंपर यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये बोलेरोचा चालक मंगेश दिलीप नागवडे हा जागीच ठार झाला. यामध्ये चालक जखमी झाल्याचे समजते. अपघात इतका जोराचा होता की, बोलेरो जीपच्या पुढील भागाचा चुराडा झाला होता. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघात झालेल्या मंगेश नागवडे यास त्याच्या चुलत भाऊ प्रदिप छगन नागवडे यांनी औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दुपारी साडेबारा वाजता दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत औषधोपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले.
सध्या नगर – सोलापुर महामार्गाचे काम चालू आहे. अनेक ठिकाणी एकेरी वाहतुक सुरु आहे. महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीच्या प्रशासनाने वाहतुकीसाठी दिशादर्शक फलक व्यवस्थीत लावले नसल्याने हा अपघात झाल्याचे निदर्शनास येत आहे. नगरकडे व सोलापूरकडे जाताना कधी कधी दोन्ही बाजूने एकाच मार्गावरून गाड्या जातात याच परिणाम अपघातात होतो आहे.
Web Title: Bolero and dumper face-to-face accident, bolero driver killed on the spot
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App