शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालासाठी मुदतवाढ, सुप्रीम कोर्टाकडून नवी डेडलाईन
Shiv Sena MLA disqualification: शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल १० जानेवारीपर्यंत लागणार आहे.
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने ३१ डिसेंबरपर्यंत आमदारांच्या निकालावर निर्णय घेण्याचे सांगितले होते. यावर आता शिवसेनेच्या १६ आमदारांच्या निलनंब प्रकरणाच्या निकालाचं लेखन करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी सुप्रीम कोर्टात २१ जानेवारीपर्यंत वेळ वाढवून मागितला होता. सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना थोडासा दिलासा दिला आहे. राहुल नार्वेकर यांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी १० जानेवारीची मुदत देण्यात आली आहे.
राहुल नार्वेकर यांच्यावतीनं तुषार मेहता यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी अध्यक्षांकडून वेळकाढूपणा होत असल्याचा युक्तिवाद केला होता. राहुल नार्वेकर यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. मात्र, सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे.
राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाकडे बाजू मांडताना २० डिसेंबरपर्यंत निर्णय सुरक्षित ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टातील यापूर्वीच्या सुनावणीत या बाबतचा अंतिम निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत घेण्याचे आदेश राहुल नार्वेकर यांना दिला होता. आता, राहुल नार्वेकर यांना १० दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. आता शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल १० जानेवारीपर्यंत लागणार आहे.
Web Title: Extension of time for verdict of Shiv Sena MLA disqualification
(आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App