Home अहमदनगर एकतर्फी प्रेमातून मुलीला धमकीः लग्न कर, नाही तर…….

एकतर्फी प्रेमातून मुलीला धमकीः लग्न कर, नाही तर…….

Ahmednagar News: एक तर्फी प्रेमातून मुलीला फोनवरून धमकी.

Threat to girl from one-sided love Marry or else

अहमदनगर: एकतर्फी प्रेमातून एका १७ वर्षीय मुलीला धमकी दिली आहे. तू माझ्यासोबत लग्न कर नाही तर जीवाचे बरे वाईट करून घेत तुझे नाव घेईन, अशी धमकी एका तरुणाने फोनवरून एका अल्पवयीन मुलीला दिल्याची घटना मंगळवारी (दि. १२) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पियश संके ( रा. दातरंगेमळा, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत मुलीने फिर्याद दिली. फिर्यादी मुलीचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले असून, ती खासगी शिकवणी घेते. तिची काही दिवसांपूर्वी संके याच्याशी ओळख झाली. त्याचे पर्यावसन मैत्रीत झाले. ते दोघे एकमेकांशी बोलत होते. त्यानंतर दोन महिन्यांनी तू माझ्यासोबत प्रेमसबंध ठेव, असे तो मुलीला म्हणाला, तेव्हापासून तो त्रास देत होता. पोलिसांनी समज दिल्याने त्याने पुढील काही दिवस त्रास देणे थांबविले होते. मंगळवारी फिर्यादी मुलगी मेडिकलमध्ये औषधे आणण्यासाठी गेली असता संके तिला दिसला. त्यामुळे ती तेथून घाईघाईने घरी निघून आली. घरी पोहोचल्यानंतर संके याने कॉल कर नाही, तर बघ मग, असा मेसेज पाठविला. त्यामुळे मुलीने त्याला फोन केला व मला त्रास देऊ नको, असे सांगितले. त्यावर त्याने तू माझ्यासोबत लग्न कर नाही तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेऊन तुझे नाव घेईन, अशी धमकी दिली.

Web Title: Threat to girl from one-sided love Marry or else

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here