कोर्टातील केस मागे घे नाही तर जिवे मारू
Ahmednagar News: कोर्टातील केस मागे घे व आम्हालाजमीन मिळण्यास काहीही हरकत नाही, असे सांग नाही तर जिवे ठार मारू, अशी धमकी न्यायालयाच्या आवारात.
श्रीरामपूर: कोर्टातील केस मागे घे व आम्हालाजमीन मिळण्यास काहीही हरकत नाही, असे सांग नाही तर जिवे ठार मारू, अशी धमकी न्यायालयाच्या आवारात श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील तरुणावर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींनी दिली. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील तरुणावर अत्याचार व मारहाण प्रकरणातील आरोपींना न्यायालयात आलेले असताना त्यावेळी या प्रकरणातील फिर्यादी शुभम विजय माघाडे हा तारखेसाठी न्यायालयात आला असता. आरोपी नानासाहेब काशिनाथ गलांडे, कुणाल नानासाहेब गलांडे व एक अनोळखी इसम या तिघांनी शुभम विजय माघाडे यास म्हणाले की, तू आमच्याविरुद्ध दाखल केलेली केस मागे घे व आम्हाला जमीन मिळविण्यासाठी काही हरकत नाही असे लिहून दे नाही तर तुला जिवे ठार मारू, अशी धमकी दिली. याप्रकरणी शुभम विजय माघाडे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा रजि.नं.२०७१/२०२३ प्रमाणे तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोलंकी करत आहे.
Web Title: If you don’t withdraw the court case, we will kill you
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App