Home महाराष्ट्र नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही विशेष योजना: मुख्यमंत्री ठाकरे

नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही विशेष योजना: मुख्यमंत्री ठाकरे

पुणे: शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. सत्तेवर आल्यावर आम्ही लगेच दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आता दोन लाख रुपयांवर थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विचार असून त्याची माहिती बँकांकडून मागविली आहे. तसेच कर्ज भरणाऱ्यासाठी देखील विशेष योजना आणली जाईल असे आश्वासन मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट वतीने दिल्या जाणाऱ्या उस भूषण पुरस्काराचे वितरण ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष शरद पवार, सहकारमंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील यावेळी उपस्थित होते.

Website Title: Latest News Special scheme for regular loan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here