अहमदनगर ब्रेकिंग: जि.प.तील लिपिक लाच घेताना रंगेहाथ पकडला
Ahmednagar News: बांधकाम (दक्षिण) विभागातील कनिष्ठ सहाय्यक असलेले लिपिक यास २२ हजार ५०० रुपयांची लाच (Bribe) घेताना रंगेहाथ.
अहमदनगर : जिल्हा परिषदेतीलसार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभागातील कनिष्ठ सहाय्यक असलेले लिपिक संतोष जाधव यास २२ हजार ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने लचपत ह (दि.१) ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती.
या संदर्भात अॅन्टी करप्शनच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तक्रार या २०२१ पासून जांभळी गावच्या सरपंच आहेत. त्यांनी गावच्या सभामंडपाकरिता आमदार निधीतून १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. जिल्हा नियोजन समितीने प्रशासकिय मान्यताही दिली होती. या कामाची वर्कऑर्डर देण्याकरिता
सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाकडे मागणी करण्यात आली. मात्र, वर्क ऑर्डर मिळाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागातील लिपिक संतोष बाळासाहेब जाधव याने वर्क ऑर्डर काढण्यासाठी मंजूर झालेल्या रकमेच्या दीड टक्के म्हणजे २३ हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार
दाखल करण्यात आली. तक्रारदार यांच्या पतीकडे जांभळी गावसाठी मंजूर झालेल्या सभामंडपाची वर्क ऑर्डर देण्यासाठी २३ हजारापैकी तडजोडीअंती २२ हजार ५०० रुपये ठरविण्यात आले. ही रक्कम स्वीकारताना जाधव यास रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिस उपअधीक्षक प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सापळा अधिकारी राजू आल्हाट, पोहेकॉ. संतोष शिंदे, बाबासाहेब कऱ्हाड, सचिन सुद्रीक यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Web Title: Clerk of G.P. caught red-handed while taking bribe
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App