Home महाराष्ट्र शिक्षक पत्नी, मुलाची हत्या करून शिक्षक पतीने घेतला गळफास

शिक्षक पत्नी, मुलाची हत्या करून शिक्षक पतीने घेतला गळफास

Solapur Crime: शिक्षक पतीने आपल्या शिक्षक पत्नीचा धारदार शस्त्राने गळा कापून, तर ११ वर्षांच्या मुलाची गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वतः शिक्षकाने साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना.

teacher's Husband suicide himself after Killing the Teacher's Wife and Son

सोलापूर | बार्शी : बार्शी शहरातील उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉट येथे शिक्षक पतीने आपल्या शिक्षक पत्नीचा धारदार शस्त्राने गळा कापून, तर ११ वर्षांच्या मुलाची गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वतः शिक्षकाने साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस

आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अतुल सुमंत मुंढे (३८), तृप्ती अतुल मुंढे (३७) व ओम अतुल मुंढे (११) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की, अतुल मुंढे हे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तर तृप्ती खाडे-मुंढे या बार्शीतील सोजर प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. मुलगा ओम हा सुयश विद्यालयात ५ वीच्या वर्गात शिकत होता.

अतुल मुंढे हे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तर तृप्ती मुंढे या बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. दोघेही उपळाई रोडवरील आपल्या घरात वरच्या मजल्यावर राहत होते.

मंगळवारी सकाळी घरातून कोणीही बाहेर न आल्याने अतुल मुंढे यांच्या आई-वडिलांनी घराचा दरवाजा ठोठावला. आतून काहीही प्रतिसाद न आल्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता तृप्ती या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करताच मुलगा अतुल, नातू आणि सून तिघांचे मृतदेह होते. हे दृश्य पाहून आई-वडिलांना जबर धक्का बसला.

अतुल मुंढे यांचे आई-वडील खालच्या मजल्यावर राहतात. वरच्या मजल्यावरील कोणीही खाली न आल्याने अतुल यांच्या आई-वडिलांनी मंगळवारी सकाळीवर जाऊन पाहिलं असता ही घटना उघडकीस आली. त्यानंतर तात्काळ बार्शी पोलिसांना कळविण्यात आले. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास सुरू आहे. या घटनेने बार्शी शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Web Title: teacher’s Husband suicide himself after Killing the Teacher’s Wife and Son

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here