Home नांदेड शेततळ्यात बुडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू

शेततळ्यात बुडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू

दोन विद्यार्थीनी जनावराला चारा आणण्यासाठी गेल्या असता त्यांचा शेततळयात बुडून मृत्यू (died ) झाल्याची घटना.

Many sisters died by drowning on the farm

Nanded | किनवट : तालुक्यातील मौजे अंबड येथील दोन विद्यार्थीनी जनावराला चारा आणण्यासाठी गेल्या असता त्यांचा शेततळयात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना सोमवार दि. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते ४ च्या दरम्यान घडली असावी अशी शक्यता आहे. याप्रकरणी किनवट पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, सोमवार दि. ६ नोव्हेंबर रोजी अंबाडी येथील दहावीत शिकणारी बहिण व चौथीत शिकणारी ही आपल्या शेतात गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. बऱ्याच वेळ झाल्यावरही त्या घरी परत न आल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांचा शोध सुरु केला असता शेताशेजारी असलेल्या तळयाबाहेर त्या दोघी बहिणींच्या चपला दिसून आल्या, त्यामुळे तळ्यात शोध घेतला असता दोघींचेही मृतदेह हाती लागले. दहावीत शिकणारी वैष्णवी प्रदीप कुमरे व चौथीत शिकणारी परिधी प्रदीप कुमरे अशी त्यांची नावे आहेत.

हा प्रकार घडल्याचे वृत्त कळल्यानंतर गावकऱ्यांनी तळयाजवळ धाव घेऊन त्यांना तळयाबाहेर काढून रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत मुलींचे वडिल प्रदीप कुमरे यांनी दिलेल्या माहितीवरुन किनवट पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास सपोनि वाठोरे करीत आहेत.

Web Title: Many sisters died by drowning on the farm

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here