Home Marathi Batmya Today Live भूकंपामुळे नेपाळ उध्वस्त, आतापर्यंत 72 जणांनी गमावले प्राण

भूकंपामुळे नेपाळ उध्वस्त, आतापर्यंत 72 जणांनी गमावले प्राण

Earthquake at Nepal: भूकंपात आतापर्यंत 72 लोकांचा मृत्यू झाला.

Earthquake at Nepal

नेपाळ:  नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा तीव्र भूकंपानं हाहाकार माजला आहे. 6.4 रिश्टर स्केलच्या भूकंपानं नेपाळमध्ये मृत्यूतांडव पाहायला मिळालं. भूकंपात आतापर्यंत 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुकुम पश्चिम आणि जाजरकोटमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं माहिती समोर येत आहे.

नेपाळमध्ये हाहाकार माजवणाऱ्या भूकंपाची तीव्रता दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात दिसली यावरून अंदाज लावता येतो. बिहारमधील पाटणा आणि मध्य प्रदेशातील भोपाळपर्यंत भूकंपाचे हलके धक्के जाणवले आहेत. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप मापन केंद्रानुसार, नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी भूकंपामुळे झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी बचाव आणि मदतीसाठी 3 सुरक्षा एजन्सी तैनात केल्या आहेत. या भूकंपाचा प्रभाव उत्तर प्रदेशातील लखनौमध्येही दिसून आला, भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरुन घराबाहेर पडल्याचं पाहायला मिळालं.

Web Title: Earthquake inEarthquake at Nepal Nepal

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here