अहमदनगर: कॉलेज युवतीला उसाच्या शेतात नेऊन अत्याचार
Ahmednagar Crime: कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीला बळजबरीने गाडीवर बसवून ऊसाच्या शेतात्त नेऊन अत्याचार (Raped) केल्याची घटना समोर आली आहे.
अहमदनगर: शहरातील एका कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीला उसाच्या शेतात घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असताना मंगळवारी (दि. 31) तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून अशोक (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) नावाच्या युवकाविरूध्द अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून व जुलै महिन्यात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगर शहरात आई-वडिल व भावासह राहणारी फिर्यादी अल्पवयीन मुलगी शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते. तिचे शैक्षणिक वर्ष जून महिन्यात चालू झाल्याने ती एक दिवस कॉलेजला आली असता तिला एक 22 ते 23 वर्षाचा युवकाने गेटवरच आवाज दिला. माझा मोबाईल नंबर घे, असे म्हणाला असता फिर्यादी मुलीने नकार दिला. दरम्यान, फिर्यादी मुलगी त्यानंतर एक दिवस कॉलेजला आली असता त्या मुलाने तिला त्याच्या दुचाकीवर बसवून वारूळाचा मारूती, दातरंगे मळा परिसरातील उसाच्या शेतात नेले व तेथे तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.
तुझ्या आई-वडिलांना सांगेल, अशी धमकी देऊन कॉलेज मध्ये आणून सोडले. फिर्यादीने सदरचा प्रकार कोणालाही सांगितला नाही. जुलैच्या दुसर्या आठवड्यात तो मुलगा फिर्यादीला भेटला असता तिने त्याचे आधारकार्ड मागितले. त्यावर अशोक नावाचा उल्लेख होता. त्या मुलाने पुन्हा फिर्यादी मुलीला वारूळाचा मारूती, दातरंगे मळा परिसरातील उसाच्या शेतात नेले व पुन्हा बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर तो मुलगा कॉलेज परिसरात पुन्हा दिसून आला नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
Web Title: college girl was taken to a sugarcane field and raped
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App