प्रेयसीच्या जाचास कंटाळून स्वतःवर गोळी झाडून पोलिस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या
पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी रात्री आपल्या सर्व्हिस रिवॉल्व्हरनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
नांदेड : एका पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी रात्री आपल्या सर्व्हिस रिवॉल्व्हरनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक कारण आता समोर आलं आहे. गोविंद मुंडे यांच्याकडे एका महिलेने लग्नाचा तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी मृत पोलिसाच्या पत्नीच्या तक्रारीवरुन उस्माननगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत महिलेसह तिघांना अटक केली आहे.
गोविंद मुंडे या पोलीस कर्मचाऱ्याने बुधवारी रात्री स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. उस्माननगर ते कलंबर रोड ही घटना घडली. पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी देखील सापडली होती. मृत गोविंद मुंडे हे यशोसाई हॉस्पिटल येथील न्युरोसर्जन डॉ ऋतुराज जाधव यांचे अंगरक्षक होते. ऑगस्ट महिन्यात हॉस्पिटलमध्ये वसमत येथील एका महिलेशी त्यांची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर दोघे जण फोन वर बोलत होते.
गोविंद मुंडे हे विवाहित असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सदर महिला आणि तिच्या आई वडिलांकडून मुंडे यांना मानसिक त्रास सुरूच होता. हे प्रकरण समजल्यानंतर मृताच्या पत्नीने सदर महिलेला फोनवरून संपर्क साधून समजूत काढण्याची प्रयत्न केली. पण मुंडे यांना मानसिक त्रास देणे सुरू होते. या त्रासाला कंटाळून गोविंद मुंडे यांनी गोळी झाडून आत्महत्या केली अशी तक्रार पत्नी जान्हवी मुंडे यांनी दिली.
तक्रारी वरून उस्माननगर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केल्याची माहिती आहे.
Web Title: Tired of being questioned by his girlfriend, a policeman committed suicide
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App