लोकसभा निवडणुकीपूर्वी अहमदनगर जिल्हा विभाजन, राम शिंदे यांचे संकेत
Ahmednagar News: अहमदनगर जिल्हा विभाजनाचे संकेत माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांच्या वक्तव्यातून समोर आले आहे.
अहमदनगर: पण अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा असल्याने या जिल्ह्याचे विभाजन होणे गरजेचे आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र लवकरच ही मागणी पूर्ण होण्याचे संकेत माजी मंत्री राम शिंदे यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत.
अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून व्हावे. याबाबत चौंडी येथील कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती.
लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्याचे नामांतर होईल अशी आशा आहे, असं भाजपचे आमदार राम शिंदे यांनी यांनी म्हंटलं आहे. याबाबत मी पंधरा दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले असल्याचे राम शिंदे यांनी म्हंटलंय.
नगर जिल्हा विभाजनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिर्डीमध्ये उभ्या राहणार्या विविध सरकारी कार्यालयांच्या इमारती पाहता जिल्हा विभाजनानंतर शिर्डी हे मुख्यालयाचे ठिकाणही निश्चित झाल्याचे स्पष्ट होते. आता फक्त जिल्हा विभाजनाची योग्य तारीख व वेळ जाहीर होण्याची प्रतिक्षा आहे. सध्याची स्थिती पाहता लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा विभाजन होण्याचे संकेत असल्याचे भाजप आ.राम शिंदे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्यात अनेक जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी होत आहे. पण अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा असल्याने या जिल्ह्याचे विभाजन होणे गरजेचे आहे. राज्याच्या मागील बजेटमध्ये अहमदनगर जिल्ह्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी पदनिर्मिती करून त्याचे मुख्यालय शिर्डी करण्यात आले आहे.
त्यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदनगर दौऱ्यावर येत असताना ते नवीन महसूल प्रशासन इमारतीचे भूमिपूजन करणार आहेत. त्यासाठी 61 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हे जिल्हा विभाजनाकडे टाकलेले पाऊल आहे, असं भाजप आमदार राम शिंदे यांनी म्हंटलं आहे.
Web Title: Ahmednagar district will also be renamed before the Lok Sabha elections, Ram Shinde
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App