Home महाराष्ट्र फडवणीस सरकारचे ताळेबंद तपासणार: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

फडवणीस सरकारचे ताळेबंद तपासणार: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: विधानसभेच्या सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्यातील टोले प्रतिटोले रंगलेले असताना उद्धव ठाकरे यांनी आज महत्वाचा निर्णय घेतला आहे. आज विधानसभेच्या अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेत्याची निवड करण्यात आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्याला आर्थिक मदत मिळविण्यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला जाणार आहेत.

फडवणीस सरकारच्या काळातील विकास कामांची माहिती मागवणार आहे. कामे कुठे होत आहे, किती खर्च झाला, किती कामे शिल्लक आहेत. कोणती कामे अडली आहेत, किती विकास केला, कोणती कामे महत्वाची आहे, कोणती कामे तातडीचे आहे याचा लेखाजोखा मागविला आहे. फडवणीस सरकारच्या कामांची श्वेतपत्रिका काढणार असल्याचा इशारा अप्रत्यक्षपणे त्यांनी दिला आहे. तसेच मंत्रीमंडळाचा तात्पुरता विस्तार करणार असल्याचे ते म्हणाले.

Website Title: Latest News Thakre government will check the balance sheet

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here