संगमनेर: गुंजाळवाडी परिसरातील शासकीय धान्य गोदामात चोरी
Sangamner Crime: गुंजाळवाडी परिसरातील शासकीय धान्य गोदामातील तीन ताडपत्र्या चोरल्याची घटना.
संगमनेर : अज्ञात चोरट्याने तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरातील शासकीय धान्य गोदामातील तीन ताडपत्र्या चोरल्याची घटना सोमवारी रात्री घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुंजाळवाडी येथे शासकीय धान्य गोदाम आहे. अज्ञात चोरट्याने सोमवारी रात्री या गोदामाच्या कार्यालयाचे कुलूप तोडुन आत प्रवेश
केला. या चोरट्याने गोदामातील ६ हजार रुपये किमतीच्या तीन ताडपत्र्या चोरून नेल्या. सदर ताडपत्र्यांची चोरी झाली असल्याचे गोदाम सांभाळणारे कर्मचारी सुनील दुर्गुळे यांच्या काल मंगळवारी सकाळी लक्षात आले. दुर्गुळे यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Theft in Government Grain Godown in Gunjalwadi
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App