कापसाच्या शेतात गांजाचे पीक, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
कपाशीच्या पिकात गांजाची लागवड करणाऱ्या एका शेतकऱ्याला शिऊर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. seized
शिऊर : वैजापूर तालुक्यातील शिऊर शिवारात टुणकी गावाजवळ कपाशीच्या पिकात गांजाची लागवड करणाऱ्या एका शेतकऱ्याला शिऊर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
शिऊर शिवारातील टुणकी गावाजवळ ग.नं. १२६ मध्ये विष्णु मन्सुब शिंदे रा. टुणकी याने त्याच्या शेतातील कपाशी पिकामध्ये गांजाची लागवड केल्याची गोपनिय माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. त्या अनुषगांने सोमवारी (दि. १६) सकाळी सपोनि संदीप पाटील यांनी पोलीस कर्मचारी तसेच नायब तहसीलदार कुलकर्णी यांना सोबत घेत शेतात जाऊन छापा मारला. त्यांना कपाशी पिकात ४६ गांजाची झाडे तसेच त्याचे वजन तीस किलो दोनशे ग्रॅम असा एकूण
दोन लाख चाळीस हजार रुपयांचा माल पोलिसांनी पंचासमक्ष जप्त केला आहे. आरोपी विष्णु शिंदे यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Ganja crop in cotton field, two lakh worth seized
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App