Home नाशिक सिन्नरची घटना: जन्मदात्या बापानेच दिली मुलाच्या खुनाची सुपारी

सिन्नरची घटना: जन्मदात्या बापानेच दिली मुलाच्या खुनाची सुपारी

Sinner: मुलगा गेला दारूच्या आहारी; बापानेच दिली खुनाची सुपारी, मारेकऱ्यांनी गळा दाबून तोंडात टाकले विषारी औषध.

father himself gave the betel nut for the child's murder

सिन्नर : दारू पिऊन आई-वडील व कुटुंबियांना त्रास देत असल्याने वडिलांनी पोटच्या मुलाला मारण्यासाठी गावातल्याच दोघांना ७० हजारांची सुपारी देऊन मुलगा राहूल शिवाजी आव्हाड (वय ३०) याचा खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २७) उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २७) दुपारच्या सुमारास पास्ते ते हरसुल रस्त्यावर परिसरातील शंकर कातकाडे यांना बंद पडलेल्या कालिया कंपनीच्या आवारातील मीटर रूममध्ये राहूलचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ गावात याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी राहूलच्या तोंडातून फेस निघत असल्याने नागरिकांच्या मदतीने राहूलला तात्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली. मात्र, राहुलने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला, याबाबत खुलासा होत नसल्याने पोलीसही बुचकळ्यात पडले असताना शवविच्छेदन अहवालात राहूलचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. यासाठी पोलिसांकडून राहूलच्या कुटुंबातील सदस्यांना व ग्रामस्थांकडे राहुलबाबत चौकशी केली. यात पोलिसांना राहूल हा मद्याच्या आहारी गेल्याने आई-वडिलांना त्रास देत असल्याचे कळून आले. तसेच तो गावातील नागरिकांही त्रास देण्यासोबत आई-वडिलांनाही मारहाण करीत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांचा संशय कुटुंबातील सदस्यांवर बळावल्याने राहुलचे वडील शिवाजी विश्वनाथ आव्हाड (वय ५०) यांची कसून चौकशी केली. यावेळी त्यांनी आपल्या मुलाला मारण्यासाठी गावातील वसंत अंबादास आव्हाड (वय ४०) व विकास उर्फ बबलू शिवाजी कुटे (वय ४३) या दोघांना ७० हजार रुपये देण्याचे कबूल करीत सुपारी दिली. त्यानंतर वसंत व विकास या दोघांनी रात्रीच्यावेळी राहूलला एकांतात गाठत त्यास हरसूले रस्त्यावरील बंद पडलेल्या कंपनीत घेऊन गेले. तेथे त्यांनी राहूलचा गळा दाबून त्याचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी राहुलचे वडील शिवाजी आव्हाड, वसंत आव्हाड व विकास कुटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कोठाळे करत आहेत.

अहमदनगर मोठी बातमी: गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल, Gautami Patil

आत्महत्या दाखविण्याचा प्रयत्न

 राहुलने स्वतःच विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली असे वाटावे म्हणून दोघांनी त्याच्या तोंडात विषारी औषध टाकून त्यास कंपनीतील मीटर रूममध्ये टाकून दिल्याची दोघांनी कबूली दिली. संशयितांनी राहूलचा गळा दाबून खून केल्यानंतर त्याच्या तोंडात विषारी औषधही टाकण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.

Web Title: father himself gave the betel nut for the child’s murder

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here