अकोले: फोफसंडी येथे संगमनेर तालुक्यातील दोन पर्यटक बुडाले, शोधकार्य सुरु
Akole News: पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या संगमनेर तालुक्यातील दोन पर्यटकांचा बुडाल्याची (drowned) घटना.
अकोले: तालुक्यातील फोफसंडी येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या संगमनेर तालुक्यातील दोन पर्यटकांचा बुडाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास समोर आली आहे. चार तरुण पर्यटनासाठी फोफसंडी येथे आले असताना ही घटना घडली.
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील हे पर्यटक असल्याची माहिती समोर आली आहे. अभिजित वर्प व पंकज पाळंदे अशी पर्यटकांची नावे आहेत. फोफसंडी येथे दुचाकी वर फिरत गेले होते. दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास हे चार पर्यटक मित्र फोफसंडी गावाजळ असणाऱ्या एका ओढ्यावर पाणवठा या ठिकाणी पाण्यात उतरले असता एकाचा पाय घसरला आणि पाण्यात बुडू लागला असता दुसऱ्याने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली पण यात दोघंही बुडालेसोबत असलेल्या दोघा मित्रांनी ही माहिती गावकर्यांना दिली. त्यांनंतर काही गावकरी घटनास्थळी पोहोचले. बुडालेले दोघांचा शोध सुरू केला आहे मात्र अद्याप त्यांचा मृतदेह सापडला नाही.
अहमदनगर मोठी बातमी: गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल, Gautami Patil
पाणवठा येथे पाण्याची खोली जास्त असल्याने यात हे पर्यटक बुडाले फोफसंडी हे अतिदुर्गम निसर्ग रम्य ठिकाण असल्याने या ठिकाणी राज्य भरातून अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात
सध्या अकोले तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्याने निसर्गाचे सौंदर्य व आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक इकडे आकर्षित होत आहे मोबाईलला नेटवर्क नसल्याने ही माहिती लवकर इतरांना समजली नाही. प्रशासकीय यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली असुन त्यांचे शोध कार्य सुरू आहे.
Web Title: Two tourists from Sangamner taluka drowned in Phofsandi
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App