चालू दुचाकीवर झाड कोसळून दोघे जागीच ठार
Accident: माडाचे झाड चालत्या दुचाकीवर कोसळून कुडाळ तालुक्यातील आंजिवडे येथील दोन युवक जागीच मृत्युमुखी.
सावंतवाडी |सिंधुदुर्ग: तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील राजवाड्यानजीकचे भेडल्या माडाचे झाड चालत्या दुचाकीवर कोसळून कुडाळ तालुक्यातील आंजिवडे येथील दोन युवक जागीच मृत्युमुखी पडले. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
राहुल प्रकाश पंदारे (वय २४) व संभाजी दत्ताराम पंदारे (२१, रा. गवळीवाडी) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही युवक भजन करून घरी परतत होते. अचानक झाड कोसळले आणि दुचाकी एका बाजूला फेकली गेली. यामध्ये दोन्ही युवकांचा मृत्यू झाला.
Web Title: Accident Two were killed on the spot when a tree fell on the running bike
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App