राजूर – गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयाला सुयश
राजूर – गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयाला सुयश
अकोले तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाला घवघवीत यश मिळाले. विद्यालयाचा एकूण निकाल 92.6% लागला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला, त्यात गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थांनी घवघवीत यश मिळविले. विद्यालयाचा एकूण निकाल 92.6% लागला.
शाखा निहाय निकाल:
विज्ञान शाखा – 91.32%
वाणिज्य शाखा – 98.73%
कला शाखा – 86.01%
शाखा निहाय पहिले तीन विद्यार्थी:
विज्ञान शाखा –
१) भडांगे निकिता दिलीप – 77.54%
२) डगळे मनीषा भिमाजी – 77.08%
३) चावडे विलास निवृत्ती – 76%
वाणिज्य शाखा-
१) झाम्बाडे सीमा विजय – 82.92%
२) मुतडक अश्विनी भगवान – 82.46%
३) टिभे तुषार संतोष – 74.46%
कला शाखा –
१) बांडे जालिंदर शिवराम – 82.15
२) बांडे अश्विनी सिताराम – 75.23
२) भांगरे आकाश रमेश – 75.23
३) कवटे प्रवीण गोविंद – 74.46%
अत्यंत महत्वाच्या या निकालाकडे सर्व विद्यार्थी शिक्षक व पालक आतुरतेने व कुतूहलाने वाट बघत होते , कारण विद्यार्थ्यांच्या कारकीर्दीच्या दृष्टीने दिशा ठरविण्याकरिता हा निकाल महत्वाचा मानला जातो.
सत्यानिकेतन संस्थेच्या वतीने संस्थेचे मा.सचिव प्रा. टी. एन. कानवडे व सह सचिव श्री मिलिंदशेठ उमराणी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्राचार्य श्री. लेंडे एम.डी. उपप्राचार्य पर्बत एल.पी. जेष्ठ शिक्षक गुजराथी सर, श्री.पाबळकर एस.एस. आणि सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती कर्मचार्यांनी अभिनंदन केले.
संगमनेर अकोले न्यूज अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.
पहा: Actor Arbaaz Khan Admits To Betting In IPL Scam