Home अमरावती प्रेयसीच्या आईला आणि भावाला जिवंत जाळलं, स्वत:लाही घेतलं पेटवून, प्रेमाचा थरारक अंत

प्रेयसीच्या आईला आणि भावाला जिवंत जाळलं, स्वत:लाही घेतलं पेटवून, प्रेमाचा थरारक अंत

Amravati Crime:  तरुणाने आपल्याच प्रेयसीच्या आईला आणि भावाला जिवंत जाळलं आणि त्यानंतर तरुणाने स्वत:ला देखील पेटवून घेत आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना.

end to love, burning the lover's mother and brother alive, and setting himself on fire Suicide

अमरावती: अमरावतीमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने आपल्याच प्रेयसीच्या आईला आणि भावाला जिवंत जाळलं आणि त्यानंतर तरुणाने स्वत:ला देखील पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या  धक्कादायक घटनेमुळे अमरावतीमध्ये एकच खळबळ उडाली आहेयाप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.

वरुड तालुक्यातील वंडली येथे रविवारी रात्री १ च्या दरम्यान आई आणि मुलाची जाळून हत्या करण्यात आली आहे. आरोपीने देखील स्वतः तेथेच जाळून घेऊन आत्महत्या केली. यामध्ये मृतक लता सुरेशराव भोंडे (वय 45 वर्ष) मुलगा प्रणय सुरेशराव भोंडे (वय 20 वर्ष) अशी जाळून हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर आरोपी आषिश ठाकरे (वय 25 वर्ष) असे स्वत: जाळून घेतलेल्या प्रियकराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही महिन्यांपासून तरुण आणि त्याची प्रेयसी एकत्र राहत होते. त्यांच्यातील प्रेमसंबंध मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यामुळे दोघेही दुसरीकडे एकत्र राहू लागले. काही काळाने या दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. वाद वाढत गेला आणि प्रेमाचं नातं तुटलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  प्रियकराशी भांडण झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून प्रेयसी आपल्या घरी राहत होती. ती आई आणि भावासोबत राहत होती. प्रेयसीला आपल्यासोबत पुन्हा घेऊन जाण्यासाठी प्रियकर सतत तिच्या घरी जात होता. यामध्ये तरुणीची आई आणि भाऊ यांच्यासोबत त्याचे भांडणही झाले.

दररोजच्या बातम्या  मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा. संगमनेर अकोले न्यूज

याच भांडणाचा राग मनात ठेऊन या तरुणाने बदला घेण्याचा निर्णय घेतला. प्रेयसी घरी नसताना त्याने तिच्या आईला आणि भावाला जिवंत जाळलं. आपण केलेल्या कृत्यामुळे भयभीत होऊन या तरुणाने पुढे स्वत:लाही संपवून घेतलं.

Web Title: end to love, burning the lover’s mother and brother alive, and setting himself on fire Suicide

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here