संगमनेरात दमदार पाऊस, वीज पडून गायीचा मृत्यू
Sangamner News: संगमनेर तालुक्यात तीन दिवसांपासून पावसाने (Rain) हजेरी लावल्याने आनंदाचे वातावरण, जनावरांच्या गोठ्यावर वीज पडून एका गायीचा मृत्यू.
संगमनेर: गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या मान्सूनने गणपती बाप्पाच्या आगमनानंतर राज्यात पुन्हा एकदा दमदार हजेरी लावलीय. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात देखील पावसाची दोन दिवसांपासून जोरदार बॅटिंग सुरू आहे.
संगमनेर तालुक्यात तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने आनंदाचे वातावरण आहे. पावसाळ्यात गेल्या तीन महिन्यापासून पाऊस न झाल्याने खरीप पिके पूर्णपणे वाया गेली. शुक्रवारी (दि. २२) रात्री ९ वाजेच्या सुमारास तालुक्यातील सावरगाव तळ येथील अण्णासाहेब बाबूराव नेहे यांचे जनावरांच्या गोठ्यावर वीज पडून एका गायीचा मृत्यू झाला. येथे तलाठी, ग्रामसेवक यांनी येऊन पंचनामा केला, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील भेट दिली.
पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना काही का होईना दिलासा मिळाला असून बळीराजा देखील सुखावला आहे. संगमनेर तालुक्याच्या साकूर पठारभागात देखील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या मान्सूनने जोरदार हजेरी लावलीय.
तसेच पावसाची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळालाय. पावसाने जोरदार हजेरी लावत पठारभाग झोडपून काढला. तसेच सर्वत्र पाणी खळखळून वाहू लागलय. त्याचबरोबर काही प्रमाणांत पिकांना जीवदान मिळतांना दिसून येत आहे. पुढील दोन दिवस देखील पावसाचा इशारा देण्यात आलाय.
दरम्यान हवामान खात्याने अहमदनगर जिल्ह्यात २३ आणि २४ सप्टेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळीवाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.
Web Title: Heavy rain in Sangamner, cow dies due to lightning
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App