Home क्राईम संगमनेरच्या दोघा व्यापार्‍यांकडून शेतकर्‍याची 6 लाखाची फसवणूक

संगमनेरच्या दोघा व्यापार्‍यांकडून शेतकर्‍याची 6 लाखाची फसवणूक

Ahmednagar News:  शेतकर्‍याकडून डाळींब विकत घेतले मात्र त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करुन पैसे न दिल्याची घटना,  व्यापार्‍यावर 6 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल.

6 lakh fraud of a farmer by two traders of Sangamner

नेवासा: शेतकर्‍याकडून डाळींब विकत घेतले मात्र त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करुन पैसे न दिल्याची घटना नेवासा तालुक्यातील देडगाव येथे घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन संबंधीत व्यापार्‍यावर 6 लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संजय साहेबराव कदम (वय 50) रा. देडगाव ता. नेवासा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की,  13 सप्टेंबर रोजी माझ्या मालकीची देडगाव शिवारातील गट नं. 204/2अ मधील शेतातील डाळिंब फळबागेतून संदीप कडलग रा. जवळा ता. संगमनेर तसेच त्याचे सोबत आलेले नसिम उलहक सुफिर्या रा. वडगावपान ता. संगमनेर यांनी माझ्याकडून 151 रुपये प्रतिकिलो दराने एकून 4 टन डाळिंब (Pomegranate) माल (एकूण रक्कम 6 लाख 4 हजार रुपये) विकत घेवून मला सदर मालाचे पैसे न देता आज रोजीपर्यंत टाळाटाळ करुन आर्थिक फसवणूक केली आहे. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी वरील दोघांवर भारतीय दंड विधान कलम 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 6 lakh fraud of a farmer by two traders of Sangamner

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here