संगमनेर कारागृहातील आरोपीचे भिंतीवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न
Sangamner Crime: कारागृहातील एका आरोपीने भिंतींवर डोके आपटून आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना.
संगमनेर: शहरात असलेल्या कारागृहातील एका आरोपीने भिंतींवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवार ता. (15) सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शोहेब शब्बीर शेख या आरोपीला गेल्या काही दिवसांपासून संगमनेर येथील कारागृहामधील बराक नंबर एकमध्ये ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शेख याने भिंतींवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी डोक्याला मार लागल्याने त्याला तातडीने उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक आशिष आरवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी शोहेब शेख याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 799/2023 भारतीय दंड संहिता कलम 309 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब घोडे हे करत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: accused in Sangamner Jail attempted suicide by hitting his head on the wall
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App