अहमदनगर: ट्रक दुचाकी अपघातात तिघे ठार
Ahmednagar News: महामार्गावर ट्रक व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास झाली. या अपघातात पुरुष, महिला व एक दीड वर्षीय मुलगी असे तिघे जण जागीच ठार.
कोपरगाव | अहमदनगर: तालुक्यातील खिर्डी गणेश शिवारात नगर-मनमाड महामार्गावर ट्रक व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना सायंकाळच्या सुमारास झाली. या अपघातात पुरुष, महिला व एक दीड वर्षीय मुलगी असे तिघे जण जागीच ठार झाले. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून, . दरम्यान, ट्रक चालक तेथून पसार झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगर-मनमाड रस्त्यावर कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश शिवारात शुक्रवारी (दि. १५) दुपारी चारच्या सुमारास ट्रक (आर.जे. १४ जी.जे. ३४६८) व दुचाकी (एमएच ४१ जे. २४५१) यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात ३५ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय महिला व दीड वर्षाची मुलगी जागीच ठार झाली. हे तिघेही पती-पत्नी व मुलगी असण्याची शक्यता घटनेबाबत अधिक माहिती अशी पोलिसांनी वर्तविली आहे. या तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांच्याजवळ ओळख पटेल अशी कोणतीही कागदपत्रे आढळून आलेली नाहीत.
या घटनेची माहिती मिळताच, पोलिस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, सहायक पोलिस निरीक्षक अशोक आंधळे, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश गवळी, रमेश झाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
Web Title: kopargaon Three killed in a truck-two-wheeler accident
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App