महिला पोलीसला गुंगीचे औषध देऊन बलात्कार, महिला पोलिसच असुरक्षित
Female Police Constable Rape in Pune: एका महिला पोलीस शिपायाला शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर पोलीस शिपायाने बलात्कार केल्याची घटना.
पुणे : पुण्यात महिला पोलिसच असुरक्षित असल्याची घटना समोर आली आहे. शहर पोलीस दलातील एका महिला पोलीस शिपायाला शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर पोलीस शिपायाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. महिला पोलीस शिपायाला पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्याकडील दागिने, लॅपटाॅप असा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दीपक सीताराम मोघे (रा. स्वारगेट पोलीस वसाहत) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिला पोलीस शिपायाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिला आणि मोघे यांची ओळख होती. टाळेबंदीत मोघे हा महिला पोलीस शिपायाच्या घरी जेवायला यायचा. त्यावेळी मोघेने महिलेला शीतपेयातून गुंगीचे ओैषध दिले. तिच्यावर बलात्कार करुन ध्वनिचित्रफीत तयार केली.
त्यानंतर ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी त्याने दिली. महिला पोलीस शिपायावर वेळोवेळी अत्याचार केले. तिला धमकावून पतीसोबत घटस्फोट घेण्यास भाग पाडले. तिला पिस्तुलाचा धाक दाखवून घरातील पाच ते सहा तोळे दागिने, मोबाइल संच, लॅपटाॅप असा मुद्देमाल चोरून नेला.. महिलेने नुकतीच खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक तोटेवार करत आहेत.
Web Title: Female Police Constable Rape in Pune
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App