अहमदनगर: चक्क रिक्षात तलवार घेऊन प्रवास
Ahmednagar News: रिक्षामध्ये तलवार बाळगल्याप्रकरणी एका तरुणास अटक (Arrested) करण्यात आली आहे.
श्रीरामपूर: रिक्षामध्ये तलवार बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री साडेबारा वाजता ही कारवाई करण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील बॅरिस्टर रामराव आदिक चौकामध्ये दानिश जावेद बागवान (वय २४, रा. सुभेदार वस्ती, श्रीरामपूर) हा तरुण एका रिक्षामध्ये आला होता. त्याने रिक्षामध्ये तलवार ठेवलेली होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. दोन पंचांसमवेत कारवाई करण्यात आली. यात लोखंडी पात्याची तलवार मिळून आली. रविवारी रात्री साडेबारा वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपी बागवान याला तलवार व रिक्षासह ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली…
Web Title: Traveling with a sword in a rickshaw. One Arrested
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App