‘मी जीव देण्याचं कारण फक्त…’ सिन्नर येथील विद्यार्थिनीनं संपविले जीवन
Sinner News: खळबळजनक घटना, तीन तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या (Suicide).
सिन्नर: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. तीन तरुणांच्या टवाळखोरीला कंटाळून एका दहावीतील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील शहा गावात उघडकीस आली आहे. त्यामुळे सिन्नरसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तीनही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गावातील तीन तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे तीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठित लिहून ठेवल्याचे समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील शहा येथील 16 वर्षीय वैष्णवी नवनाथ जाधव या शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. आत्महत्या करण्यापूर्वी संशयित आरोपी वैभव विलास गोराणे, अंकुश शिवाजी धुळसैंदर व एक अल्पवयीन मुलाचे नाव चिठ्ठीत लिहून ठेवत या तीघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले.
वैष्णवी ही भैरवनाथ हायस्कूलध्ये दहावीत शिकत होती. दोन दिवसांपूर्वी शाळेच्या परिसरात टवाळखोरी करत मुलींना त्रास देणार्या गावातील तिघांसोबत तिचा वाद झाला होता. या तिघांनी तिच्या घरी जाऊन तिला व तिच्या वडिलांना दमदाटी केली होती. तसेच तिच्या वडिलांना धमकावत वैष्णवी तुला जगण्याचा अधिकार नाही. तू जीव दे नाहीतर आम्ही तुझा जीव घेतो, अशी धमकी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलत मंगळवारी रात्री आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी तीने चिठ्ठी लिहून ठेवत या तीन संशयित आरोपींमुळे आत्महत्या केली.
घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी पोलिसांना तपासात वैष्णवीने आत्महत्या केली, त्या खोलीत वहीच्या कागदावर लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. त्यात तिने गावातीलच वैभव विलास गोराणे, अंकुश शिवाजी धुळसुंदर व आणखी एका अल्पवयीन मुलाच्या नावाचा उल्लेख केला आहे. तिघेजण आपल्याला नेहमीच त्रास देत होते. माझ्यासह शाळेतील अनेक मुलींना त्यांनी त्रास दिला आहे. मी विरोध केला म्हणून त्यांनी घरी येवून वडिलांना माझ्याबद्दल वाईट साईट सांगितले. शिवीगाळ करून धक्काबुक्की देखील केली. ते तिघेही वाईट प्रवृत्तीचे असून पुन्हा त्रास देतील व पुन्हा काही झाल्यास घरी वडील मारतील या भीतीने मी आत्महत्या करत आहे, असा उल्लेख या चिठ्ठीत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: Tired of suffering, three youths girl commit suicide
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App