Home क्राईम कोचिंगवरून परतणाऱ्या तरुणीवर चाकूने सपासप वार करीत हत्या, धक्कादायक घटना!

कोचिंगवरून परतणाऱ्या तरुणीवर चाकूने सपासप वार करीत हत्या, धक्कादायक घटना!

Crime News: कोचिंगवरून घरी येत असलेल्या तरुणीवर चाकूने सपासप वार करत तिची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना.

Young woman who was returning from coaching was Murder by stabbing 

कल्याण: कोचिंग क्लासहून घरी येत असलेल्या तरुणीवर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केल्याची  धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण शहरातील तिसगाव भागात ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आदित्य कांबळे (रा.कल्याण) असं आरोपीचं नाव आदित्यने तरुणीची हत्या का केली?, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. कल्याणमधील दुर्गा देवी सोसायटीच्या आवारात ही घटना घडली आहे. त्यामुळं आता शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, , कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरातील दुर्गा देवी सोसायटीत राहणारी तरुणी कोचिंगहून घरी येत होती. त्याचवेळी आरोपी आदित्य कांबळे याने तरुणीवर जीवघेणा हल्ला चढवला. आदित्यने तरुणीच्या डोक्यावर, छातीवर आणि मानेवर चाकुने सपासप वार केले. तरुणीने आरडाओरड करताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला पकडून तरुणीला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केलं. परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

आरोपी आदित्य कांबळे हा कालपासून दुर्गा दर्शन सोसायटीतील लोकांकडून मयत तरुणीविषयीची माहिती घेत होता. त्यावेळी तो कशासाठी माहिती विचारतोय, हे रहिवाशांना समजलं नाही. परंतु मुलगी कोचिंगला गेली असता आरोपी सोसायटी परिसरात दबा धरुन बसलेला होता. तरुणीवर चाकुने सपासप वार करत आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तरुणीचा आवाज ऐकून धावत आलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिलापोलिसांच्या ताब्यात देण्यात आले अन पोलिसांनी या प्रकरणात आरोपी आदित्य कांबळेवर हत्येच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Young woman who was returning from coaching was Murder by stabbing

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here