मित्रांनीच मित्राचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला
Pimpri Crime: मित्रांनीच मित्राचा खून करून मृतदेह विहिरीत टाकून पसार झाल्याची घटना.
पिंपरी: मित्रांनीच मित्राचा खून करून मृतदेह विहिरीत टाकून पसार झाल्याची घटना उद्योगनगर चिंचवड येथे उघडकीस आली आहे. विधीसंघर्षित मुलासह अभिषेक ऊर्फ डल्या गायकवाड (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
गणेश ऊर्फ दाद्या भगवान रोकडे (वय १८, रा. चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याच्या आईने फिर्याद दिली आहे. ९ ऑगस्टच्या रात्री दहापासून गणेश बेपत्ता होता. त्याचा मृतदेह १२ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता उद्योगनगर येथील लोहमार्गालगतच्या विहिरीत आढळला. त्याचे डोके, माण, पोट, कपाळ, छातीसह शरीरावर अन्य ठिकाणीही जखमा होत्या. त्याचे मित्र अभिषेक व एक अल्पवयीन मुलगा यांच्यावर खुनाचा आरोप गणेशच्या आईने केला आहे. मात्र, खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही.
Web Title: friends who Murder the friend and threw the body into the well
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App