अश्लील फिल्म दाखवून पत्नीला विवस्त्र नाचायला लावून तो करायचा शूटिंग
Pune Crime: अश्लील फिल्म दाखवून पत्नीला विवस्त्र अवस्थेत नाचायला लावून त्याचे शूटिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर.
पुणे: अश्लील फिल्म दाखवून पत्नीला विवस्त्र अवस्थेत नाचायला लावून त्याचे शूटिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विकृत पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका ३१ वर्षांच्या महिलेने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोघांचा २०१५ मध्ये विवाह झाला असून त्या नानापेठेत पतीबरोबर राहत होत्या. त्यांना पती अश्लील चित्रफीत
दाखवून अनैसर्गिक संभोग करत असे. तसेच विवस्त्र अवस्थेत नाचायला लावून त्याचे चित्रीकरण करत असे. त्याला विरोध केल्यावर ते शूटिंग व्हायरल करण्याची धमकी देत असे. यामुळे पत्नी माहेरी निघून आली. तेथेही तिला त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांची बहीण काम करत असलेल्या ठिकाणी ती सेक्स रॅकेट चालवित आहे, अशा आशयाचे पत्र पाठवून तिची बदनामी केल्याचे सदर महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: shoot by showing pornographic films and making his wife dance naked
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App