Home अहमदनगर अहमदनगर: वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह तिसऱ्या दिवशी आढळला

अहमदनगर: वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह तिसऱ्या दिवशी आढळला

Ahmednagar News: जगप्रसिद्ध रांजणखळग्यात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह (Dead body) तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी कुंडापासून सहाशे मीटर अंतरावर आढळला.

Dead body of the washed-up woman was found on the third day

पारनेर | Parner : पारनेर तालुक्यातील निघोज येथील जगप्रसिद्ध रांजणखळग्यात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी कुंडापासून सहाशे मीटर अंतरावर आढळला.

निघोज कुंड येथील रांजणखळगे पाहताना मंगळवारी (दि.8) नदीत पडलेल्या महीलेचा मृतदेह सापडला. वाशिम जिल्ह्यातील पदमाबाई शेषराव काकडे (55) असे या घटनेत मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला वाशिम येथून रांजणगाव एमआयडीसीमध्ये कामाला असलेल्या जावई महेंद्र शहादेव औताडे यांच्याकडे आली होती.

हात -पाय धुण्यासाठी ती खडकाळ परिसर असलेल्या रांजणखळगे परिसरात धोक्याच्या ठिकाणी गेली. मात्र शेवाळलेल्या खडकावरून पाय घसरल्याने रांजणखळग्यात वाहून गेली होती.

औताडे यांचे कुटुंबीय देवी दर्शनासाठी कुंडावर आले होते. हात पाय धुण्यासाठी ही महिला खडकाजवळ गेली. शेवाळयुक्त खडकावरुण पाय घसरून महिला कुंडात वाहून गेली. जावई महेंद्र औताडे यांनी प्रयत्न करुनही सासुला वाचवण्यास त्यांना अपयश आले. सोबत असलेला महिलेचा जावई महेंद्र औताडे हाही महिलेला वाचविताना थोडक्यात बचावला. पोलीस व ग्रामस्थांनी 38 तास शोधमोहीम राबवून मृतदेह सापडण्यासाठी परिश्रम घेतले.

ही घटना घडल्यानंतर कुकडी नदीला येडगाव धरणातून सोडण्यात आलेले पाणी बंद केले होते. पाणी बंद झाल्यानंतर महिलेचा मृतदेह कुंडापासून अंदाजे सहाशे मीटर अंतरावर असलेल्या वस्तीजवळ सापडल्याची माहिती पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश डहाळे ठाकर

घटनेनंतर मळगंगा ग्रामीण ट्रस्ट, ग्रामपंचायत, संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, उपनिरीक्षक हनुमंत उगले, गणेश डहाळे, मयुर तोरडमल, शिवाजी कडूस, योगेश खाडे आदींनी महिलेच्या शोधासाठी प्रयत्न केले.

Web Title: Dead body of the washed-up woman was found on the third day

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here