संगमनेर बसस्थानकात बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू
Sangamner Accident: संगमनेर बसस्थानकात बसखाली चिरडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर बसस्थानकात बसखाली चिरडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १०) दुपारी ४. १५ वाजेच्या सुमारास घडली. बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या नाशिक- अहमदनगर या बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाला.आयेशा मुनीर बेग (वय ५५, रा. संगमनेर खुर्द, ता. संगमनेर) असे या अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिन्नर आगाराची संगमनेर, लोणी, राहुरी असा मार्ग असणाऱ्या नाशिक- अहमदनगर बस (एम. एच. २०, बी. एल. ४०५६) संगमनेर बसस्थानकात आली होती. आयेशा बेग या त्यांच्या नातेवाईकांसह संगमनेर बसस्थानकात आल्या होत्या. दुपारी ४. १५ वाजेच्या सुमारास ही बस बसस्थानकातून बाहेर पडत असताना तिच्या चाकाखाली आयेशा बेग चिरडल्या गेल्या. त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
दरम्यान राज्यात बस अपघाताचे सत्र सुरुच आहे. यातच या अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Web Title: Sangamner Accident woman died after being crushed under a bus at a bus stand
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App