Home बुलढाणा मित्रांसोबत पिकनिकला गेला, पिकनिक ठरली अखेरची

मित्रांसोबत पिकनिकला गेला, पिकनिक ठरली अखेरची

मित्रांसोबत पिकनिकला गेलेल्या १६ वर्षाच्या मुलाचा वारी हनुमान रांजण्या डोहात बुडून (drowning ) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

16-year-old boy died after drowning in the Hanuman Ranjana river

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र वारी भैरवगड येथे आडनदी पात्रातील रांजण्या डोहात एका १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. अनिकेत संजय मुरोदे असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.  तो अकोला जिल्ह्यातील हीवरखेड येथील रहिवासी आहे. अनिकेत हा वारी हनुमान जवळील रांजण्या डोहात मित्रांसोबत पोहायला गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो डोहात बुडाला. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मित्रांसोबत पिकनिकला गेलेल्या १६ वर्षाच्या मुलाचा वारी हनुमान रांजण्या डोहात बुडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलाच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वारी हनुमान हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे पाण्याचे डोह आहेत.

शनिवार आणि रविवारी येथे अनेक पर्यटक पिकनिकसाठी आणि डोहात अंघोळीचा आनंद लुटण्यासाठी येतात. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील अनिकेत देखील रविवारी सुट्टी असल्याने मित्रांसोबत वारी हनुमान येथे पिकनिकला गेला होता. रांजण्या डोहात सर्व मित्र पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने अनिकेत पाण्यात बुडाला. रात्री उशिरापर्यंत मुलाला शोधण्यासाठी मोहीम राबवण्यात आली. तब्बल १८ तासांनंतर सकाळी मुलाचा मतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: 16-year-old boy died after drowning in the Hanuman Ranjana river

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here