Home Accident News अकोले पोलिस ठाण्यात करे यांची नियुक्ती, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्या

अकोले पोलिस ठाण्यात करे यांची नियुक्ती, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बदल्या

Ahmednagar News: जिल्हा पोलिस दलातील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्या. (Transfers of Police Inspector)

Appointment of Kare in Akole Police Station, Transfers of Police Inspector, Sub-Inspector

अहमदनगर : जिल्हा पोलिस दलातील पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक विजय करे यांची अकोले पोलिस ठाण्यात, तर जिल्ह्यात नव्याने हजर झालेले पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांची सायबर पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली आहे.

नगर पोलीस दलातील जिल्ह्याअंतर्गत बदल्यांच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू असतानाच शनिवारी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यात दहा निरीक्षक, 17 सहायक निरीक्षक व 22 उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या असून, यापूर्वी 19 पोलीस अधिकार्‍यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली होती, त्यांना सोडण्यात आले आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षात बर्‍याच दिवसांपासून असलेले पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यावर अकोले ठाण्याची जबाबदारी सोपवली आहे. तर, जिल्ह्यात नव्याने हजर झालेल्यांच्या यादीत असलेले पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांना सायबर ठाण्याचे प्रमुख करण्यात आले. तसेच, नव्याने हजर झालेल्या निरीक्षकांपैकी प्रदिप देशमुख यांना कोपरगाव शहर ठाण्याची जबाबदारी देण्यात आली.

निरीक्षक हरिश खेडकर यांना एएचटीयुचे प्रभारी करण्यात आले. निरीक्षक अशोक भवड यांना मानव संसाधन येथे नियुक्ती देण्यात आली. निरीक्षक दिगंबर भदाणे यांची ट्रायल मॉनेटरिंग सेलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले व रामराव ढिकले यांची नाशिक ग्रामिणमध्ये बदली करण्यात आली होती, त्यांना नगर जिल्हा पोलीस दलातून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

Web Title: Appointment of Kare in Akole Police Station, Transfers of Police Inspector, Sub-Inspector

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here