Home अहमदनगर अहमदनगर: मुलीची छेड; रोडरोमिओ दोघांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर: मुलीची छेड; रोडरोमिओ दोघांविरुद्ध गुन्हा

Ahmednagar News: अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून मुलीची छेड काढल्याप्रकरणी शहरातील दोन रोडरोमिओंविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला विनयभंग (Molested) व बालकांचे अत्याचार संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल.

Molested a girl Crime against both Rodromeo 

जामखेडः मोटारसायकलवरून अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून मुलीची छेड काढल्याप्रकरणी शहरातील दोन रोडरोमिओंविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला विनयभंग व बालकांचे अत्याचार संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड येथे शिक्षणासाठी ग्रामीण भागातील अनेक मुली घेण्यासाठी येतात. एसटी किंवा खासगी वाहनांतून बस स्टॉपवर उतरून शाळा किंवा कॉलेजला पायी ये जा करावी लागते. मात्र, पायी चालताना तरुणांकडून होणाऱ्या छेडछाडीच्या समस्यांचाही मुलींना मोठा सामाना करावा लागत आहे. शहरातील अनेक रोडरोमिओ शाळा किंवा कॉलेज सुटल्यावर मोटारसायकलवरून मुलींचा पाठलाग करतात. या रोडरोमिओंचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी पालकांनी व नागरिकांनी करुनही मुलींच्या छेडछाडीचे प्रकार सुरुच आहेत. दि. १७ जुलै २०२३ रोजी तालुक्यातील एका खेड्यातील मुलगी व तिची मैत्रीण शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बसस्थानकाकडे जात असताना आरोपी तेजस पोकळे व सार्थक उतेकर (पूर्ण नाव माहीत नाही), या दोघांनी मोटारसायकलवरून येत या मुलींचा पाठलाग केला. मुली बसस्थानकामध्ये आल्यावर वरील आरोपींनी अल्पवयीन मुलीस अश्लील बोलत मुलीची व साक्षीदार यांची छेड काढली. याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला आठ दिवसानंतर शहरातील दोन रोडरोमिओंविरोधात विनयभंग व बालकांचे अत्याचार संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती करत आहेत.

Web Title: Molested a girl Crime against both Rodromeo 

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here