संगमनेर तालुक्यात हॉटेल ‘राजमहाल’ फोडले
Sangamner Crime: तालुक्यातील हॉटेल राजमहालमध्ये चोरट्यांनी चोरी (Theft) केल्याची घटना .
संगमनेर : नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील हॉटेल राजमहालमध्ये चोरट्यांनी चोरी केल्याची घटना १२ ते १५ जुलै दरम्यान ही घडली. याप्रकरणी दशरथ विठ्ठल डुबे (रा. वेल्हाळे, ता. संगमनेर, मूळ रा. पेमगिरी, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, नाशिक-पुणे महामार्गावरील राजमहाल हॉटेलच्या पाठीमागील बाजूचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
चोरट्यांनी लॉकर, गल्ल्यातील दहा हजार रुपये, कागदपत्रे, बॅटरी, चार्जर, पक्कड, बूट, कपडे, कोट असा एकूण ११ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. अधिक तपास शहर पोलीस करीत आहे.
Web Title: Hotel ‘Rajmahal’ was theft in Sangamner taluka
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App