धक्कादायक! शेततळ्यात आढळले तीन मृतदेह, अहमदनगर जिल्ह्यातील घटना
Ahmednagar News: एका महिलेसह तिच्या दोन बालकांचे मृतदेह एका शेततळ्यात (Dead body) तरंगताना आढळून आले, आत्महत्या की घातपात.
जामखेड: जामखेड तालुक्यातील हाळगाव येथे एका महिलेसह तिच्या दोन बालकांचे मृतदेह एका शेततळ्यात तरंगताना आढळून आले आहेत. 10 जुलै पासुन सदर महिला व मुले बेपत्ता होते. ही आत्महत्या की घातपात याची परिसरात उलटसूलट चर्चा सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
चांदणी उर्फ उमा बबन पाचरणे (वय 31) दिपाली बबन पाचारणे (वय 11) व राजवीर बबन पाचारणे (वय 8, रा. सर्व हळगाव, ता. जामखेड) अशी या घटनेतील मृतांची नावे आहे. मिळालेल्या माहितीनुसार हाळगाव येथील पोलीस पाटील सुरेश यशवंत ढवळे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला माहिती दिली की, हाळगाव येथील शेतकरी भीमराव माहदू पिंपळे (रा. हळगाव) यांच्या गट नंबर 434 मधील शेतातील शेततळ्यामध्ये दोन स्त्री जातीचे व एक पुरुष जातीचे असे एकूण तीन मृतदेह पाण्यामध्ये तरंगत आहेत. हे तीघेही हळगाव गावातील आहेत. मिळालेल्या खबरीवरून जामखेड पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे पोलीस कर्मचारी घेऊन घटनास्थळी पोहोचले. गावकर्यांच्या मदतीने सदर मृतदेहांना शेततळ्यातून बाहेर काढले. दोन वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून त्या मृतदेहांचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. सदर महिला व मुले बेपत्ता असल्याची तक्रार मंगळवारीच (दि. 11) रोजी जामखेड पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली होतीही घटना नेमकी आत्महत्या कि घातपात याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करीत आहेत.
Web Title: Three dead body were found in the farm Suicide or murder
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App