महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या, धक्कादायक कारण आले समोर
महाविद्यालयीन विद्यार्थिनीने सततच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
नांदेड: नांदेड जिल्ह्यातील बारड तालुक्याच्या मुदखेड येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीने सततच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुदखेडच्या शिवाजी कनिष्ठ महाविद्यायात बारावीचे शिक्षण घेणाऱ्या सपना सतीश पेढे (रा. निवघा ता मुदखेड) या विद्यार्थिनीने सतत होणाऱ्या छेडछाडीतून विहरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मयत सपना मुदखेडच्या शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. दरम्यान शाळेत जातांना काही तरुणांकडून छेडछाड करणे, शिट्या मारणे, दुचाकी घेऊन मागे पुढे फिरणे, आवाज देणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने सपना चिंतेत होती. तर रोजच्या छेडछाडीला कंटाळून तिने याबाबत घरच्यांना कल्पना दिली होती. त्यामुळे तिच्या परिवाराने गाव पंचायतीकडे तक्रारही केली होती. परंतू याकडे सर्वांनी दुर्लक्ष केल्याने, सपनाने विहरित उडी घेऊन आत्महत्या करत जीवन संपविले आहे. त्यामुळे मुलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Web Title: College student’s suicide, shocking reason
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App