Home पुणे पुणे-नाशिक प्रवास होणार आरामदायक, ही नवीन सेवा सुरु

पुणे-नाशिक प्रवास होणार आरामदायक, ही नवीन सेवा सुरु

Nashik Pune Highway Bus: जन शिवनेरी पुणे-नाशिक प्रवास करण्यासाठी आरामदायी.

Pune-Nashik journey will be comfortable, this new service is launched

पुणे : नाशिक पुणे मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेन सुरु करण्याची घोषणा झाली आहे. सेमी हायस्पीड प्रकल्पासाठी जमिनीचे काम सुरु आहे. त्यामुळे पुणे-नाशिक प्रवास करण्यासाठी सध्या तरी रस्ते वाहतूक हाच एकमेव मार्ग आहे. परंतु रस्ते वाहतुकीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. त्यांच्यासाठी नवीन सुविधा सुरु झाली आहे.

पुणे मुंबई मार्गावर राज्य परिवहन महामंडळाने नवीन सुविधा सुरु केली आहे. राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बसेस सुरु होती. परंतु या मार्गावर पुणे-मुंबईला मिळणारी शिवनेरीसारखी सुविधा सुरु झाली आहे. पुणे-मुंबई महामार्गावर इलेक्ट्रीक शिवनेरी बसेस सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आधीच्या शिवनेरी बसेस पुणे नाशिक महामार्गासाठी सुरु करण्यात आल्या आहेत. त्याला जन शिवनेरी हे नाव दिले आहे. यामुळे हा प्रवास आरामदायी होणार आहे.

जन शिवनेरी सेवेला सकाळी ५ वाजेपासून सुरुवात होणार आहे. दर तासाला ही बस सुटणार आहे. पुणे नाशिक प्रवास करणाऱ्या अनेक जणांना या सुविधेचा लाभ होणार आहे. जन शिवनेरी बसेसचा तिकीट दर शिवशाहीपेक्षा थोडा अधिक आहे. जन शिवनेरी बसेस ५०० रुपये आहे तर शिवशाही बसेचा तिकीट दर ४७५ रुपये आहे. ही बस सेवा कमी दरात सुरु करण्यात आली आहे. अन्यथा शिवनेरीचा दर या मार्गासाठी ७०० रुपये होऊ शकतो. शिवनेरी बसेस सुरु झाल्यामुळे शिवशाही बसेसची सेवा बंद करण्यात आली आहे. या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी आहे, त्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आता जन शिवनेरी सुरु झाल्यामुळे प्रवास आरामदायक होणार आहे.

Web Title: Pune-Nashik journey will be comfortable, this new service is launched

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here