मध्यरात्री थरार! दरोडेखोरांचा पोलिसांवर गोळीबार, एक पोलिस जखमी
Pune Robbery: एटीएम लुटण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीवर कारवाईच्या दरम्यान, दरोडे खोरांनी पोलिसांवर गोळीबार (fired) केला. या घटनेत एक पोलिस कर्मचारी हा जखमी झाला आहे. पोलिसांनी देखील बचावासाठी गोळीबार.
पुणे: पुणे पोलिस गुरुवारी कोम्बिंग ऑपेरेशन करत असताना एटीएम लुटण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीवर कारवाईच्या दरम्यान, दरोडे खोरांनी पोलिसांवर गोळीबार केला. या घटनेत एक पोलिस कर्मचारी हा जखमी झाला आहे. पोलिसांनी देखील बचावासाठी गोळीबार केला. या थरारावेळी एका आरोपीने धारदार शस्त्र फेकून मारले. ही घटना वारजे पोलिस ठाण्याच्या हद्दीत एसबीआय बँकेच्या एटीएम जवळ घडली. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वारजे येथे एटीएम लुटल्याच्या तयारीत एक दरोडेखोरांची टोळी तयारीत होती. दरम्यान, पुणे पोलिसांतर्फे शोध मोहीम सुरू असतांना त्याना हा प्रकार दिसाला. या दरोडेखोरांना पोलिस अटक करण्याचा प्रयत्न करत असतांना दरोडेखोरांनी त्यांच्या जवळील बंदूक पोलिसांवर रोखली. दरम्यान, एकाने गोळी झाडल्याने तसेच एकाने कोयता फेकून मारल्याने एक पोलिस कर्मचारी दरोडेखोर आणि पोलिस यांच्यात झालेल्या चकमकीत जखमी झाला आहे.
गुन्हे शाखेचे एक पथक हे रात्री १ च्या दरम्यान गस्त घालत होते. यावेळी कोंबिंग ऑपरेशन सुरू होते. दरम्यान गुन्हे शाखेकडील युनिट ०३ चे अधिकारी व कर्मचारी , एसीपी तांबे वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हाडा वसाहतीजवळ असलेल्या एसबीआयच्या एटीएम मशीन जवळ आठ ते दहा दरोडेखोरांची टोळी ही एटीएम लुटण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांना दिसले. या दरोडे खोरांना पकडण्यासाठी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे, युनिट 3 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार व युनिट तीनचे पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या दिशेने जात असताना एका संशयित आरोपीने पोलीस पथकाच्या दिशेने पिस्तुल रोखले.
यावेळी आरोपींनी पोलिस पथकाच्या दिशेने गोळीबार केला. पोलिस पथकाने आरोपीच्या दिशेने फायरींग केले. यादरम्यान झालेल्या झटापटीमध्ये एका आरोपीने पोलिस शिपाई कट्टे यांच्या दिशेन धारदार शस्त्र फेकून मारल्याने ते जखमी झाले. दरम्यान, आरोपी पळून जात असतांना पाच जणांना पोलिसांनी अटक केली. तर इतर पाच आरोपी हे अंधारातून टेकडीच्या दिशेने पळून गेले. इतर आरोपींचा शोध चालू आहे. तसेच नमूद घटनेबाबत वारजे माळवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे. इतर आरोपींची शोध चालू आहे.
तसेच नमूद घटनेबाबत वारजे माळवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून एक गावठी कट्टा त्यामध्ये जिवंत चार राऊंड दोन लोखंडी कोयते कटावणी स्क्रू ड्रायव्हर हातोडा असा मुद्देमाल त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आला आहे. ताब्यात घेतलेले आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांच्या विरूद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
Web Title: fired at police, one policeman injured
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App