Home अहमदनगर रस्त्यात अडवत आरोपीचं धक्कादायक कृत्य; नगरमधील घटनेनं महाराष्ट्र हादरला

रस्त्यात अडवत आरोपीचं धक्कादायक कृत्य; नगरमधील घटनेनं महाराष्ट्र हादरला

Ahmednaagr News:  नगरमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार (accused).

an act of the accused blocking the road in Maharashtra was shaken

अहमदनगर | Pathardi : गेल्या काही दिवसांपासून नगरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नगरमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव इथे ही घटना घडली.

अल्पवयीन मुलीची छेड काढून तिला मारहाण केल्याची घटना रविवारी संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास समोर आली. आरोपी रफिक उर्फ लाल्या मुनीर पठाण याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं. या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून कठोर शासन व्हावे यासाठी पाथर्डी पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी संघटना रात्री ठाम मांडून होती.

हनुमान टाकळी गावातली दोन अल्पवयीन सख्या बहिणी तिसगावच्या बस स्थानकावर उभ्या होत्या,त्यावेळी आरोपी पठाण याने मुलीची छेड काढून त्यांना मारहाण केली तसेच तिचा मोबाईल फोन फोडला. या घटनेने हिंदुत्ववादी संघटना पुढे आल्या आहेत.

या प्रकरणामुळे तिसगाव शहरात काही काळ वातावरण बिघडलं होतं. पोलीस अधिकारी आणि ग्रामपंचायत चे सत्ताधारी गटातील व्यक्तींचे शाब्दिक बाचाबाची झाली. या आरोपीने अनेक गुन्हे केले असून त्याच्यावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून यापूर्वी आरोपीने मुलीची छेड काढली होती. त्यावेळी स्थानिक पातळीवर तो वाद मिटवण्यात आला होता.

Web Title: an act of the accused blocking the road in Maharashtra was shaken

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here