फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लॉजवर अनेकवेळा विवाहितेवर अत्याचार
Latur Crime: तुझ्यासह मुलीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करतो, अशी धमकी देत, अंबाजोगाई येथील एका महिलेवर लातुरात अत्याचार (Rape) करण्यात आल्याची घटना.
लातूर : तुझ्यासह मुलीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करतो, अशी धमकी देत, अंबाजोगाई येथील एका महिलेवर लातुरात अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील गवळीपुरा भागात राहणाऱ्या एका इसमाने एका विवाहितेचे आणि तिच्या मुलीचे शॉर्ट फिल्म बनविण्यासाठी म्हणून अनेक फोटो काढले आणि व्हिडीओ तयार केले होते. मात्र, विवाहिता आणि तिच्या मुलीने शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्यास नकार दिला. त्यामुळे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगत आरोपीने फोटो, व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेला लातुरात आणून एका लॉजवर अनेक वेळा अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Threatening to spread the photos virally, the married couple was rape
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App