श्री दत्त कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिटयुट, राजूरचे विद्यार्थ्यांची गगनभरारी
राजूर: महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे तर्फ घेण्यात आलेल्या जीसीसी-टीबीसी शासकीय कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स या ऑगस्ट २०१९ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात विषेश प्राविण्यासह विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
श्री दत्त कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिटयुट राजूरचे ग्रामीण, आदिवासी व अतिदुर्गम भागातील विद्यार्थी :- इंग्रजी विषयात ३० श.प्र.मी.मध्ये शिंदे शितल नामदेव ९५% , मराठी ३० श.प्र.मी.मध्ये मुंढे कोमल तुकाराम ९५% तसेच इंग्रजीत ४० श.प्र.मी. मध्ये पंडूरे तेजस मोहन ९०.५% आणि मराठी ४० श.प्र.मी. मध्ये हिले अशोक रामदास ८०.५ % गुण घेऊन संस्थेतून प्रथम येण्याचा मान पटकविला, या सह झडे योगिता भगवंता ९०%, मुंढे पुनाजी रामा ८९.५%, भांगरे गणेश बुधा ८९.५%, सुकटे मिलींदकुमार सोमनाथ ८७%, लहामगे अपेक्षा शरद ८४.५%, बेंडकोळी एकनाथ देवराम ८४.५% गुण घेऊन उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, संस्थेचे प्राचार्य आभाळे सर आदींनी अभिनंदन केले व या यशात विद्यार्थ्यांचा नियमितपणा व परिश्रम तसेच पालकांचा विश्वासाचा मोठा वाटा आहे अशी भावना व्यक्त केली.
Website Title: Latest News Shri Datt Typing Center success