प्रसिद्ध उद्योगपती संतोष शिंदेंनी पत्नी, मुलासह आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये…
Kolhapur: शहरातील प्रसिद्ध उद्योगपती संतोष शिंदे यांनी आपल्या पत्नी आणि मुलांसह राहत्या घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना.
कोल्हापूर: जिल्ह्यातील गडहिंग्लज शहरातील प्रसिद्ध उद्योगपती संतोष शिंदे यांनी आपल्या पत्नी आणि मुलांसह राहत्या घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाखाली ते जेलमध्ये देखील गेले होते. या घटनेपासून ते तणावात आले होते. तणावामुळेच त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळं शहर परिसरात खळबळ उडाली.
गडहिंग्लज येथील उद्योगपती संतोष शिंदे यांनी अगदी कष्टाने आणि परिश्रमाने अर्जुन उद्योग समूहाची स्थापना केली होती. या अंतर्गत त्यांनी तेल उत्पादन, व्यायामशाळा, बेकरी उत्पादन यासह विविध उत्पादने सुरू केली होती.
संतोष शिंदे यांचा हा व्यवसाय महाराष्ट्रासह मुंबई आणि कर्नाटकमध्ये देखील पोहचला होता. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांखाली ते महिनाभर जेलमध्येदेखील होते. यानंतर ते बाहेर आले. तेव्हापासून ते मानसिक तणावाखाली असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
तुरुंगातून आल्यानंतर ते तणावाखाली होते. तर आज सकाळी ते बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्यामुळे त्यांच्या आईने शेजाऱ्यांना मदतीला घेत दरवाजा तोडला. तर बेडरूममध्ये संतोष शिंदे. त्यांची पत्नी आणि मुलाचे मृतदेह आढळून आले.
प्राथमिक अंदाजानुसार सुरुवातीला विष पिऊन व त्यानंतर गळ्यावर सुरी फिरवून त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. संतोष शिंदे यांनी कोरोना काळात बरीच सामाजिक काम केली होती. आता अशा परिस्थितीत ते जीवन संपवतील असं कोणालाही वाटलं देखील नव्हतं. या घटनेमुळं शहर परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: famous industrialist Santosh Shinde committed suicide by drinking poisonous medicine
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App