Home अहमदनगर अहमदनगर: भरवस्तीत सशस्त्र दरोडा, कुटुंबातील दोघांचा मृत्यू, महिला जखमी

अहमदनगर: भरवस्तीत सशस्त्र दरोडा, कुटुंबातील दोघांचा मृत्यू, महिला जखमी

Ahemdnagar News: भल्या पहाटे तीन ते चारच्या दरम्यान चोरट्यांनी दरोडा (robbery) टाकला, सशस्त्र दरोड्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी.

Armed robbery in trust, two in family killed, woman injured

अहमदनगर |  शेवगाव: शहरात आज पहाटे दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील दोघे ठार झाले असून एक महिला जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बलदवा कुटुंबावर दरोडेखोरांनी हल्ला केला आहे. या घटनेमुळे शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शेवगाव  येथील भुसार मालाचे व्यापारी गोपीकिसन बलदवा यांच्या राहत्या घरावर आज (23 जून) भल्या पहाटे तीन ते चारच्या दरम्यान चोरट्यांनी दरोडा टाकला. सोबतच या सशस्त्र दरोड्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी आहे. या दरोड्याच्या निषेधार्थ आज शेवगाव बंद पुकारण्यात आला आहे.

शेवगावच्या जैन गल्लीत वास्तव्यास असलेल्या बलदवा कुटुंबियांच्या घरावर आज पहाटे दरोडा पडला. या घटनेत दोन दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत गोपीकिसन बलदवा (वय 55 वर्षे) आणि त्यांची भावजय पुष्पा बलदवा (वय 65 वर्षे) या दोघांचा मृत्यू झाला. तर गोपीकिसन बलदवा यांच्या पत्नी सुनिता बलदवा या दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरोडेखोरांनी डोक्यामध्ये लोखंडी सळईच्या सहाय्याने वार केल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू झाला,घरातील काही ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला आहे. बालदवा यांच्या एका मित्राने गावाला जायचे म्हणून काही रक्कम त्यांच्याकडे ठेवण्यासाठी दिली होती, ती देखील चोरांनी नेली. पाळत ठेवून हा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात सातत्याने खुन, दरोड्याच्या घटना घडत आहे. पोलीस यंत्रणेवर ताण वाढला असून आता पुन्हा आज पहाटे शेवगाव शहरात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आहे. बलदवा कुटुंबावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्लात दोघे ठार झाले असून बलदाव कुटुंबाची महिला जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरोडेखोरांनी घरातील काही ऐवज लुटला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आहे. फिंगरप्रिंट, डॉगस्काॅड पथकही पाचारण करण्यात आले आहे.

Web Title: Armed robbery in trust, two in family killed, woman injured

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here