हादराविणारी घटना: बेपत्ता झालेल्या तीन चिमुकल्यांचे मृतदेह कारमध्ये आढळले
Nagpur: बेपत्ता झालेल्या दोन लहान मुली व एका मुलाचा मृतदेहच (Dead bodies) आढळल्याने खळबळ उडाली.
नागपूर: रविवारचा दिवस नागपुरातील समाजमन पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फारुखनगरमधून शनिवारी बेपत्ता झालेल्या दोन लहान मुली व एका मुलाचा मृतदेहच आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या घराजवळील परिसरातच उभ्या असलेल्या एका कारमध्ये हे मृतदेह आढळले. यामुळे परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आलिया फिरोज खान (वय ६), आफरीन इर्शाद खान (६) आणि तौसीफ फिरोज खान (४) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. ही तीन मुले शनिवारी दुपारी बेपत्ता झाली होती. नातेवाइकांनी आजूबाजूच्या भागांमध्ये शोध घेतल्यावरदेखील न आढळल्याने पोलिसांत तक्रार करण्यात आली. रविवारी दुपारनंतर पोलिसांनी श्वानपथकाच्या माध्यमातून शोध सुरू केला. त्यावेळी एका वाहनाजवळ श्वानाने इशारा दिला. पोलिसांनी कार उघडून पाहिली असता त्यात तिघेही निपचित पडलेले आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. गुदमरून मृत्यू झाल्याची शक्यता
घटनास्थळाजवळचे रहिवासी व पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कार काही दिवसांपासून या मुलांच्या घराजवळच उभी होती. खेळता-खेळता मुले आत गेली व लॉक झाल्याची शक्यता आहे. गरमीमुळे कारच्या आतील तापमान वाढले असावे व त्यात गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.
Web Title: Dead bodies of the three missing children were found in the car
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App