Home कोपरगाव पुण्यातून बेपत्ता असलेल्या कोपरगावच्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, एमपीएससी परीक्षेत राज्यात आली होती...

पुण्यातून बेपत्ता असलेल्या कोपरगावच्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू, एमपीएससी परीक्षेत राज्यात आली होती सहावी

Kopargaon: नगर जिल्ह्यातील कोपरगावच्या उच्चशिक्षित तरुणीचा संशयास्पद मृत्यू (Suspicious Death) झाल्याची घटना, मृतदेह अर्धवट सडलेल्या स्थितीत आढळून आला.

Suspicious Death of Kopargaon girl missing from Pune

पुणे:  किल्ले राजगड पायथा (ता.वेल्हे) येथील सतीचा माळ या ठिकाणी काल रविवार दि. 18 जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नगर जिल्ह्यातील कोपरगावच्या उच्चशिक्षित तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

दर्शना दत्ता पवार (वय.26) असे तरुणीचे नाव असून मुळ गाव, संजीवनी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कॉलनी, सहजानंदनगर ,ता.कोपरगाव, जि.अहमदनगर असे असून तिची रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदावर नव्याने निवड झाली होती. ती एमपीएससी परीक्षेत राज्यात सहावी आली होती.

दर्शना पुण्यातून 12 जून पासून बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल होती. दरम्यान या घटनेबाबत वेल्हे पोलीस ठाण्यात मुलीचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत वेल्हे पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, 9 जून रोजी दर्शना ही पुण्यातील एका खाजगी अकॅडमी (स्पॉटलाईट) मध्ये सत्कार स्विकारण्यास आली होती. दुसर्‍या दिवशी 10 जून रोजी दर्शनास दिवसभर घरातील व्यक्तींकडून फोन येत असताना घरातील कोणत्याही व्यक्तीचे फोन तीने उचलले नाहीत.

दरम्यान मुलीच्या वडिलांनी 12 जून रोजी पुणे येथे येऊन अकॅडमीमध्ये चौकशी केली असता मुलगी दर्शना ही तिचा मित्र राहुल दत्तात्रेय हंडोरे यांच्यासोबत सिंहगड व राजगड किल्ले फिरण्यासाठी गेली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुलीचा शोध चालू होता.

दरम्यान काल रविवारी किल्ले राजगडच्या पायथ्याशी असलेल्या सतीचा माळ येथे गुंजवणी ग्रामपंचायतचे सदस्य शिवाजी भोसले हे गुरे चारत असताना जवळपास काही दुर्गंधी येत असल्याचे जाणवल्यानंतर त्यांनी परिसरात पाहणी केली असता एक मृतदेह अर्धवट सडलेल्या स्थितीत आढळून आला.

Web Title: Suspicious Death of Kopargaon girl missing from Pune

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here