Home अकोले अकोले: अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या व तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक

अकोले: अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या व तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक

Akole News: अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या व तिच्यावर अत्याचार (abused) करणाऱ्या नराधमाला जेरबंद करण्यात यश आले आहे. पीडित मुलगी गर्भवती.

abducted a minor girl and abused her was arrested

अकोले:  ६ महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या व तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र या दरम्यान पीडित मुलीवर वेळोवेळी केलेल्या अत्याचारामुळे ती गर्भवती असल्याचे समोर आले आहे.

मुलगी अल्पवयीन असताना देखील तिला लग्नाचे आमीष दाखवून घरातून पळवून नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला म्हणून पोलिसांनी सदर आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्यास ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आकाश राजू उघडे (वय ३० वर्ष, हल्ली रा. विरगाव, ता. अकोले, मूळ रा. शेळके वस्ती, नांदुरी दुमाला ता. संगमनेर) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीच्या पालकांनी सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या आपल्या मुलीचा नातेवाईकांच्या मदतीने शोध घेतला असता ती गिरगाव शिवारातील बाळू नाईकवाडी यांच्या शेतातील घरामध्ये आढळून आली. अल्पवयीन मुलीला पळवून नेत सहा महिन्यांपासून तिच्यावर अत्याचारकेला.

फिर्यादीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की. फिर्यादीच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार आरोपी आकाश उघडे हा फिर्यादीच्या घरी येत जात असे. फिर्यादींच्या मुलीस तू मला आवडतेस आपण लग्न करू असे म्हणून आपण कुठेतरी जाऊ असे सांगत सहा महिन्यापूर्वी आरोपीने फिर्यादीच्या मुलीला पळवून नेले होते. सहा महिन्याच्या या कालावधीत आरोपीने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले, व त्यापासून तिला दिवस गेले. ती गर्भवती आहे. तसेच आरोपीने तिला ‘तू जर तुझ्या आईकडे घरी जायचे नाही तू जर आईच्या घरी गेलीस तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीसुद्धा दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यासंदर्भात अकोले पोलीस ठाण्यात आरोपी राजू उघडे यांच्याविरुद्ध गुन्हा नंबर 392 / 2023 भारतीय दंड विधान कलम 376 (2) (1) (N) 376(3) 366 (31) 506 सह पोक्सो 4.5 (1) (2) उल्लंघन 6.10 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हंडोरे करत आहेत.

Web Title: abducted a minor girl and abused her was arrested

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here